Breaking News

कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

महाड ः प्रतिनिधी

कोरोनाशी सामना करण्यासाठी महाड आरोग्य विभाग सज्ज झाला असून याकरिता महाड औद्योगिक वसाहतीमधील महाड उत्पादक संघटना आणि प्रीव्ही कंपनीकडून औषधे आणि मास्क देण्यात आले आहेत. महाड ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच भविष्यात रुग्णांवर उपचार करताना औषध पुरवठा कमी पडू नये याकरिता महाड उत्पादक संघटना आणि प्रीव्ही कंपनीने सामाजिक बांधिलकीतून महाड ट्रॉमा सेंटरला औषधे व मास्क दिले आहेत. या वेळी ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिरादार, महाड उत्पादक संघटनेचे श्री. पठारे, अशोक तलाठी, व्यवस्थापक जयदीप काळे, प्रीव्ही कंपनीचे मिलिंद गुरव आदी उपस्थित होते. एमएमएकडून देण्यात आलेल्या औषधसाठ्यात 50 हजार सॅनिटायझर्स, 25 हजार मास्क, तर प्रीव्हीकडून एन 95 मास्क, 100 पी. पी. ई. कीट असे साहित्य दिले आहे. प्रीव्हीकडून जवळपास दोन लाखांचे, तर एमएमएकडून पाच लाखांचे साहित्य दिले आहे. या औषधसाठ्यामुळे महाड आरोग्य विभाग कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला असून यामुळे शासकीय ट्रॉमा सेंटरला मोठा आधार प्राप्त झाल्याचे डॉ. भास्कर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply