Breaking News

‘घरी थांबूनच डॉ. आंबेडकर जयंती साजरी करा’

पनवेल : प्रतिनिधी
कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी थांबूनच साजरी करू या. कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करू. त्या आधी कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेवून घरीच थांबा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
ना. आठवले म्हणाले की, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची पाच जणांना परवानगी प्रशासनाने द्यावी. या दिवशी आपल्या घरावर निळा झेंडा लावून बाहेर जाहीर कार्यक्रम मिरवणूक न काढता घरी राहून मिठाई, पुरणपोळी करून महामानवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भीमजयंती साजरी करावी.
जनतेने घरीच राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिलपर्यंत जाहीत केलेला 21 दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करावा असे सांगत ‘आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वतःचे भक्षक’, असे काव्यात्मक  आवाहनही ना. आठवले यांनी यानिमित्ताने केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply