नवी दिल्ली, मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 4067वर पोहोचली आहे. एकूण 109 जणांचा आतापर्यंत मृत्यू आहे. यातील 30 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला असून 693 नवे करोना रुग्ण देशात आढळून आले आहेत, तर 4067 रुग्णांपैकी तबलीघी जमात मरकझशी संबंधित 1445 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सोमवारी (दि. 6) देण्यात आली. महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 868वर पोहोचली आहे. सोमवारी एकाच दिवशी 120 रुग्णांची भर पडली. यातील 68 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper