Breaking News

रायगडात एकाच दिवशी 26 कोरोना बळींची नोंद

पनवेल : रामप्रहर वृत्त 

रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 23) झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये  पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 326, अलिबाग 68, पेण 58, रोहा 32, माणगाव 29, मुरूड 20, उरण व खालापूर प्रत्येकी 19, महाड 18, कर्जत 17, श्रीवर्धन व पोलादपूर दोन आणि तळा, सुधागड व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43,079 आणि मृतांची संख्या 1159 झाली आहे. जिल्ह्यात 36,693 जण कोरोनामुक्त झाल्याने 5227 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply