Breaking News

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; मुस्लिम समाजाचा पुढाकार

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे माणगावमधील मोर्बा येथील मुस्लिम समाज बांधवांनी लक्ष केंद्रित करून परिसरातील सात आदिवासी वाड्यांतील 500 कुटुंबांना साधारण 450 रुपये किमतीचे कांदा, बटाटा, दोन प्रकारच्या डाळी, तेल, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, मीठ असे एका कुटुंबाला कमीत कमी आठवडाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 6) करण्यात आले. मोर्बा मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी नजरेसमोर ठेवून हे काम केल्यानेे तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, इकबाल धनसे, मोर्बा मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे, उपसरपंच मोर्बा इकबाल हर्णेकर, इम्तीयाज धनसे, अल्ताफ धनसे, संताजी पवार, राजू मोरे, अब्दुल्ला गंगरेकर, ग्रामसेवक नरेश तरडे, तलाठी किशोर मालुसरे, पोलीस पाटील उस्मान धनसे, झुल्फिखार राऊत, आझिम बंदरकर व अन्य सहकारी उपस्थित होते. या सर्वांनी सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गरीब आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply