पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पवार दाम्पत्याने आपली मुलगी दुर्वाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 100 गरीब, गरजू व फुटपाथवरील निराधारांना सोशल डिस्टन्स ठेवून अन्नदान केले. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची आवश्यकता असल्याने शिक्षक कुणाल पवार यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा केला.कुणाल पवार हे जिल्हा परिषदेच्या सुधागड येथील पायरीचीवाडी शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. पवार दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपत 100 गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप केली. या उपक्रमासाठी आईवडील, भाऊ, वहिनी, पत्नी यांचे सहकार्य लाभल्याचे कुणाल पवार यांनी सांगितले.