Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; दिघाटी गावातील विधवा महिलांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरस पसरू नये त्या करिता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. गरिबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या वतीने दिघाटी गावात  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूमध्ये कांदे, बटाटे, मसाला, हळद तेल आदींचा समावेश होता. या वेळी दिघाटी ग्रामपंचायत सरपंच अमित चांगाजी पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, केळवणे पंचायत समितीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, युवा कार्यकर्ते राजेश ठाकूर, कैलास पाटील, लक्ष्मण ठाकूर, राकेश पाटील, मच्छिंद्र पाटील  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रत्येक वेळी सर्वांच्या उपयोगी पडणारे व आपल्या केळवणे मतदारसंघाची सामाजिक बांधिलकी जपणारे आमदार महेश बालदी यांच्या सामाजिक कार्याला सलाम…!– अमित पाटील, सरपंच, ग्रामपंचायत दिघाटी

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply