Breaking News

खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन जाहीर

पनवेल : प्रतिनिधी

खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून महापालिका आयुक्तांनी खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.  पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून खारघर सेक्टर 15 मधील घरकुल सोसायटीत तीन रुग्ण सापडले असून हा हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव महापालिका क्षेत्रातील अन्य भागात होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे.महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर येथील घरकुल, सेक्टर 15 व त्या आजूबाजूच्या परिसरातील गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य  ठिकाणी स्थलांतर करण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

पनवेल, पेण महावितरणकडून विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार

कोरोना विषाणूचे थैमान जगभर पसरले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोनाबाधित लोकांसाठी काही  इमारतींची विलगीकरण कक्षासाठी निवड केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार महावितरणच्या पनवेल शहर विभाग व पेण मंडळाने, प्रत्येक इमारतीत 40 ते 200 एम्पियरचे मीटर, लावून तत्काळ या इमारतींना वीजपुरवठा उपलब्ध करून दिला. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार महावितरणच्या पनवेल शहर विभाग व पेण मंडळाने  एमएमआरडीएच्या पनवेल शहर येथील बालाजी सिम्फनी व पेण मंडळातील पनवेल ग्रामीण विभागातील मॅराथॉन नेक्सन या इमारतींची विलगीकरण कक्षासाठी निवड केली. त्यांचे महावितरण वाशी मंडळातील पनवेल शहर विभाग व  पेण मंडळाद्वारे या कक्षाचे  विद्युतीकरण युद्धपातळीवर एका दिवसात पूर्ण करण्यात आले. प्रत्येक इमारतीत 40 ते200 एम्पियरचे मीटर, असे एकूण चार मीटर लावण्यात आले व तत्काळ या इमारतींना वीजपुरवठा देण्यात आला. भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता, पुष्पा चव्हाण यांच्या नेतृत्वात वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने व पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही क्षेत्रांतील इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply