Breaking News

उरणमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील कोट नाका येथे बुधवारी (दि. 8) निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरण कक्षात सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला असून नागरिकांनी निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करताना कक्षात जातांना कक्षात मास्कचा वापर करावा, हात वर करून डोळे बंद करावे, निर्जंतुकीकरण कक्षाचा सर्वांनी वापर करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन उरण नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक तथा भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी, उरण नगरपरिषद आरोग्य निरीक्षक महेश लवटे, सर्व नगरसेवक, कर्मचारी, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी  भाजपा उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील आदी उपस्थित होते. उरण शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्यात आली आहे तसेच धुरांडी करण्यात आली असून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी कामाशिवाय फिरू नये. मास्कचा वापर करावा. सतत हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply