Breaking News

‘रिलायन्स’कडून आदिवासी वाड्यांत धान्यवाटप

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत रिलायन्स नागोठणे कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपून बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह 22 आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब जनतेतून रिलायन्सने नेमकी गरज ओळखून मदतीचा हात दिल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीची घोषणा करून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍या मजूर, श्रमजीवी, कष्टकरी वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा वेळी आशिया खंडातील सर्वांत मोठा कारखाना म्हणून ख्याती असलेल्या रिलायन्स नागोठणे उद्योग समूहाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, उपाध्यक्ष चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्या पुढाकाराने व स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कंपनी परिसरातील गोरगरीब व गरजवंतांना जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. बेणसे ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर पारधी, उपसरपंच उद्धव कुथे, ग्रामसेवक सुप्रिया पाटील, झोतिरपाडा ग्रामपंचायत सरपंच ज्योती तरे, उपसरपंच नरेश पाटील, ग्रामसेवक संजय जाधव, तसेच कुहिरे ग्रामपंचायत सरपंच प्रज्ञा जवके आदींनी धान्यवाटप कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. या वेळी लाभार्थी नागरिकांनी रांगेत उभे राहून सुरक्षित अंतर ठेवत मास्कचा वापर करून धान्य स्वीकारले. समाजातील गरीब, गरजूंच्या मदतीसाठी रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, वरदा कुलकर्णी, डी. के. मनवर, अरविंद बुरुमकर आदी अथक परिश्रम घेत आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply