Breaking News

15 वर्षीय अभिषेककडून गरजूंना मदत

मुंबई : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर याने या कामगारांसाठी आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू यासाठी निधी गोळा करुन जमविलेल्या वस्तूंचे वाटप केले.

तरुण पिढी म्हणजेच आपल्या भविष्याची आशा आहे असे म्हणतात. सध्या जगभरात जे साथीच्या रोगाचे भितीदायक वातावरण पसरले आहे, त्याची जाणीव होऊन आपल्या देशातील अनेक तरुण सर्वोत्कृष्ट गोष्टी घडवून आणत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे एक 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर. जो मुंबईच्या हिल स्प्रिंग इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा विद्यार्थी आहे. याने केलेली उत्कृष्ट कामगिरी म्हणजे, भारतात लादलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन, अभिषेकने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी, आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू व निधी गोळा करुन पुरविल्या आहेत.

आपले ध्येय साध्य करण्यासाठी, त्याने सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (सीएफटीआय) यांचे सहकार्य घेतले. आणि रायगडच्या अलिबाग, मुरुड आणि रोहा भागातील 150 कुटुंबांना पाच किलो तांदूळ, एक किलो गहू, एक किलो डाळ, एक लिटर तेल, एक किलो मीठ, 200 ग्रॅम मसाले, चार फेस मास्क आणि एक हॅण्ड वॉश आणि सॅनिटायझर यांचे वितरण केले, जे घोषित लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना पुरेल.

अभिषेकच्या दृढ निश्चयामुळे आतापर्यंत त्याने ह्या कामगिरी साठी 1,53,000 रुपये जमा केले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढतच आहे. त्याच्या धाडस आणि इच्छाशक्तीने इतरांनी प्रेरित व्हावे समाजासाठी आपले योगदान द्यावे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply