Breaking News

पनवेल भाजपचे एक पाऊल पुढे!

आतापर्यंत 10 हजारहून अधिक गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य सुरू केलेले आहे. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहती, दुर्गम भाग, आदिवासी बांधव आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणार्‍यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहरात आतापर्यंत 10 हजार 50 गरीब गोरगरीब कुटुंबाना मदत मिळालेली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबीय उपाशी राहू नयेत यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले, ज्याचा लाभ शेकडो कुटुंबियांना झाला आहे.
पनवेल भाजपच्या माध्यमातून मोलाची मदत पुरविण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या लोकप्रतितिनिधींनीही योगदान दिले आहे. दरम्यान भाजप-आरपीआय युतीच्या सर्व 54 नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत
कार्यवाहीसाठी आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. त्याचबरोबर भाजप नगरसेवक, लोकप्रतिनिधी हे महापालिका क्षेत्रात लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊनही मदत करीत आहेत.
ठाकूर कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : कोणतीही आपत्ती असो दानशूर अशी ख्याती असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून दोन हजार कुटुंबांना मदत होईल अशा जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द करण्यात आले.
या पॅकेटमध्ये तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे पनवेल परिसरातील हातावर पोट असलेले लोक उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना मदतकार्य सुरू केले आहे. पनवेल परिसरातील विविध विभागांत गोरगरीबांना ही मदत पोहोचली जात आहे. त्याच अनुषंगाने तहसील कार्यातून होणार्‍या मदतकार्यात हातभार लागावा, यासाठी जीवनावश्यक वस्तूंची पॅकेट्स देण्यात आली आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply