पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच आहे. नागोठणे विभागातील भाजप कार्यकर्ते मारुती देवरे, रामचंद्र देवरे, तुकाराम राणे, परशुराम तेलंगे, संतोष लाड यांच्या माध्यमातून गोडसई येथील अनेक कार्यकर्ते त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 8) भाजपत दाखल झाले. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. या
पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील गोडसई येथील ग्रामस्थ सुभाष कदम, पांडुरंग कदम, अशोक कदम, तुळशीराम कदम, सुरेश जाधव, तानाली कदम, गोपीनाथ कदम, दत्ताराम कदम, संतोष कदम, कृष्णा कदम, सागर कदम, अमोल कदम, निलेश कदम, नरेंद्र कदम, ज्ञानेश्वर कदम, प्रथमेश कदम, आशिष कदम, किरण कदम, कल्पेश कदम, योगेश कदम, तुकाराम कदम आदींनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत प्रवेश केला.