Breaking News

कामोठ्यात नर्सला कोरोनाची लागण

पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 22

पनवेल : प्रतिनिधी
कामोठे येथे शनिवारी (दि. 11) एक कोरोना रुग्ण आढळला. ही महिला मुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. या नव्या रुग्णामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 झाली आहे.
कामोठे येथील रहिवासी असलेल्या महिलेला मुंबईत हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ती मुंबईतील खाजगी रुग्णालयात 2 एप्रिलपासून उपचार घेत आहे. तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.
दरम्यान, पनवेल कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या सहा सीआयएसएफ जवानांपैकी तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर तिघांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. याशिवाय कोविड-19 चाचणी केलेल्या 319 नागरिकांपैकी 270 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 27 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे पॉझिटीव्ह 22 पैकी चौघे बरे झाले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply