Breaking News

शालेय पोषण आहार पालक-विद्यार्थ्यांना वितरित

म्हसळा ः प्रतिनिधी

शालेय पोषण आहार योजनेंर्तगत शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्याचा साठा शाळेतील विद्यार्थी, पालकांना वितरित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील 110 शाळांतील 153.73 क्विंटल तांदूळ व 35.34 क्विंटल डाळीचा साठा संबंधित विद्यार्थी व पालकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती म्हसळ्याचे गटशिक्षण अधिकारी संतोष शेडगे यांनी दिली. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने शालेय पोषण आहार विद्यार्थांना देणे आवश्यक असल्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतल्याने तांदूळ व धान्य विद्यार्थी व पालकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शेडगे यांनी सांगितले. तालुक्यातील म्हसळा 12, कणघर 9, वरवठणे 12, चिखलप 11, पाभरे 12, आडी 7, संदेरी 12, पाष्टी 12, आमशेत 9, मेंदडी 6, नेवरूळ 8 अशा तालुक्यातील 110 शाळांतील 3156 विद्यार्थी-पालकांना धान्याचे वाटप करण्यात आले.  या वेळी शाळेचे चेअरमन समीर बनकर, शिक्षक एकनाथ पाटील, मंगेश कदम, दीपक सूर्यवंशी, उद्धव खोकले, दिलीप भायदे, गांगुर्डे, सहारे, शिपाई जंगम, देवमन गहला, पालक बाळाराम गाणेकर, दत्ताराम गाणेकर, साहिल जंगम, मोहन वाघे, प्रकाश पवार, लक्ष्मण पवार, सागर गुप्ता, सुनील टिंगरे, विजय खताते, प्रवीण खताते, नरेश घडशी आदी उपस्थित होते.

मद्यविक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल

पेण ः प्रतिनिधी

संचारबंदीत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे शासकीय आदेश असूनही पेणमधील कामार्ली येथील वैभव बीअर शॉपीच्या मालकाने मद्यविक्री केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी रायगड जिल्हा कार्यक्षेत्रातील मद्यविक्री दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही या आदेशाचा भंग करून आरोपीने स्वतःचे वैभव बीअर शॉप उघडून 16 हजार 430 रुपयांचा प्रोव्हिबिशन माल अवैधरीत्या विकताना पोलिसांना आढळला. या प्रकरणी त्याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार तडवी करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply