Breaking News

रस्त्यांवर संदेश रेखाटून कोरोनाविषयक जनजागृती

रोहे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांना मात्र लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, परंतु रोह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला व अन्य साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने 10 ते 13 एप्रिल या कालावधीत रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनला नागिरकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या कालावधीत रोहा नगरपालिकेने कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला आहे. त्यानुसार शहराच्या प्रमुख चौकांत रस्त्यांवर संदेश रेखाटण्यात येत आहेत. राम मारुती चौक, तीन बत्ती नाक्यासह अन्य ठिकाणी रस्त्यावर संदेश रेखाटले आहेत. मीच माझा रक्षक, तुम्ही विनाकारण रस्त्यावर फिरून तुमच्या कुटुंबाला व शहराला धोक्यात आणत आहात, घरी राहू, कोरोना टाळू, माझे आरोग्य माझी जबाबदारी, कोरोना हरेल देश जिंकेल, असे जनजागृतीपर संदेश प्रमुख चौकांत रेखाटण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply