Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस सतर्क

सर्वच प्रवेशद्वारांवर कसून चौकशी ; अन्य यंत्रणाही सोबतीला

रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांच्या वतीने गस्त घालणे, वाहनांची कसून चौकशी करणे, विनाकारण फिरणार्‍या गाड्यांवर कारवाई यांसह संचारबंदीच्या काळात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वांत जास्त ताण पोलिसांवर आला आहे. रोहा पोलिसांसोबत मुख्यालयातील पोलीस, बिट मार्शल, वाहतूक पोलीस, दामिनी पथक व होमगार्ड ठिकठिकाणी तैनात आहेत. रोहा पोलीस ठाण्याव्यतिरिक्त रेल्वे स्टेशन कॉर्नर, अष्टमी नाका, नवरत्न हॉटेल, खारी चेक पोस्ट नाका, तांबडी चेक नाका, दमखाडी नाका, तीन बत्ती नाका, दोन पेट्रोलपंप, नगरपालिका चौक यांसह शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्वच प्रवेशद्वारांवर येणार्‍या-जाणार्‍यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अपुरी संख्या असतानाही पोलीस आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

 रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून त्यातील महत्त्वाचे तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असलेले रोहा पोलीस स्टेशन आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी आपले सहकारी सहाय्यक पो. नि. सुभाष जाधव यांना सोबत घेत रोहा शहरासह ग्रामीण भागात चांगले नियोजन केले आहे.

रोहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धाटाव औद्योगिक क्षेत्र, रोहा शहर, रेल्वेस्थानक, बसस्थानक व रोहा शहर येते. सध्या रोहा बसस्थानक व रेल्वेस्थानकातील रेलचल बंद आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे पोलिसांवर ताण पडत आहे. लॉकडाऊनमुळे रोहा बंद आहे, परंतु विनाकारण रोहा शहरात फिरणार्‍या व्यक्तींची संख्या वाढल्याने रोहा पोलिसांनी रोह्यात कडक कारवाईस सुरुवात केली आहे. पोलीस रोज 100 ते 150 वाहनांवर कारवाई करीत आहेत तसेच शेकडो वाहनांची रोज चौकशी करण्यात येत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply