Breaking News

वाहतूक कोंडी न होण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ-शिरवणे व बेलापूर येथील महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामामुळे चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये यासाठी वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. याठिकाणी विविध उपाययोजनांसह अतिरिक्त वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सायन-पनवेल मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडी होत होती, परंतु आता यात चांगली सुधारणा झाली असून या मार्गावर अतिरिक्त वाहतूक पोलीस ठेवण्यात आले आहेत, तसेच 31 डिसेंबरच्या दिवशी या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्यासाठी व पार्टी करण्यासाठी मुंंबईबाहेर जात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना व नागरीकांना वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर एखादी गाडी बंद पडली तरी तत्काळ गाडी काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून गर्दी टाळण्यासाठी संख्याबळ अधिक ठेवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कामामुळे तुर्भे ते खारघर पनवेल पर्यंतची वाहतूक काही प्रमाणात सुधारली आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे हलकी वाहने, कार पामबीच मार्गावरुन वळवण्यात आली आहेत, तसेच कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहन बंद पडल्यास तातकाळ हटवण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले असून 31 डिसेंबरलाही या मार्गावर चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

-तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply