Breaking News

भाजप नगरसेवकांकडून नागरी समस्यांचे निराकरण

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यासह नगरसेविका रूचिता लोंढे यांनी कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रभागात सातत्याने संपर्कात राहून आवश्यक असणार्‍या गरजांची दखल घेवून त्याची माहिती वेळोवेळी प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सोशल मिडीया व व्हॉटसअ‍ॅपद्वारे पोहचवून अडीअडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे प्रभागात कौतुक होत आहे.

प्रभाग क्र.18 चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील तसेच प्रभाग 19च्या नगरसेविका रूचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी गेल्या 20 दिवसांपासून सातत्याने प्रभागातील प्रत्येक नागरिकांची काळजी घेण्याची सुरूवात केली आहे. प्रत्येक सोसायटीत औषध फवारणी त्याचप्रमाणे आवश्यक असणार्‍या गरजांमध्ये पाणी समस्या, लोकांसाठी भाजी विक्री केंद्र लावणे तसेच गॅस एजन्सीच्या गाड्या वेगवेगळ्या वेळी प्रभागात बोलावून शासनाने दिलेल्या नियमावली प्रमाणे चौकट आखून प्रत्येकाला त्याचे वितरण करणे आवश्यक ती माहिती देणे आदीबाबत या दोघांनी एक महत्वाची भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर ज्या रहिवाशांना धान्याची, औषधांची किंवा इतर वस्तूंची गरज असेल किंवा वैद्यकीय सोयी सुविधा हव्या असतील त्या सुद्धा त्यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसापासून त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामाची दखल प्रभागातील जनतेने घेतली आहे व त्यांचे सोशल मिडीयामध्ये चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply