Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील वाजे येथे साकारणार गणपती घाट

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे होत आहेत. याच अनुषंगाने त्यांच्या निधीतून वाजे गावात गणपती विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 14) झाले.
भूमिपूजन समारंभास पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच मथुरा पाटील, उपसरपंच गणेश पाटील, हभप यशवंत पाटील, माजी सरपंच राजेश भोईर, रेवण पाटील, राजेंद्र भालेकर, राघो पाटील, वाजे सदस्य शाम भालेकर, रुपेश भोईर, अनिल भोईर, पदू वाघ, विजय पाटील, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कामासाठी आठ लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
दरम्यान, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सदस्यपदी राजेश भोईर यांची निवड झाल्याबद्दल या वेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

संविधानाचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त न्याय, समता आणि …

Leave a Reply