Breaking News

पनवेल शहरात कोरोनाची दस्तक

चालकाला लागण; तालुक्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या 29

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला  आहे. हा रुग्ण ओलाचालक असून तो इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27, तर रायगड जिल्ह्यातील आकडा 29वर पोहचला आहे.
पनवेल शहरातील इस्रायल तलाव परिसरात राहणारा चालक मुंबई विमानतळावरून प्रवाशांना ओलाची सेवा देत असे. तो एमजीएम रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याला पनवेलच्या कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 23 झाली असून उलवे नोडमधील चार रुग्णांमुळे पनवेल तालुक्यात 27, तर उरणमधील दोन रुग्ण धरून रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 झाली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेल्या 342पैकी 293 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 20 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नाहीत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन असतानाही काही लोक सोशल डिस्टन्सिंग न पाळता बिनधास्त फिरताना दिसत आहेत. अनेक जण लहान मुलांना घेऊन देवळात जात आहेत. कोणी लहान मुलांना दुचाकीवर मास्क न बांधता फिरवत आहेत. बँक ऑफ इंडिया पनवेलच्या शाखेबाहेर तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. आता शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने लोक शहाणे बनून प्रशासनाला सहकार्य करतील, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply