Breaking News

उरणमध्ये महिला मेळाव्यास प्रतिसाद

मान्यवरांचा सहभाग, कलागुणांचे झाले दर्शन

उरण : वार्ताहर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांच्या वतीने उरण येथे महिला मेळावा 2019चे आयोजन  रविवारी (दि. 10) रोजी करण्यात आले होते. सुमारे 1300 महिलांनी सहभाग घेतला होता.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ए. एफ एस. मिनी अब्राहम उपस्थित होत्या. यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्ञान पर ध्येयंम या ब्रीदवाक्याचे साजेसे मोलाचे मार्गदर्शन केले. नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांनी स्त्रियांनी कोणत्याही समस्या आल्या तरी घाबरून जाऊ नये त्याला तोंड द्यावे, त्यातून मार्ग काढावा. आजची स्त्री ही सबला आहे, सक्षम आहे. आपले जीवन आनंदात घालवावे. महिलांनी एकमेकींना मदत करावी, असे सांगितले.

या प्रसंगी मेळावा अध्यक्षा प्रगती प्रकाश दळी, मेळावा उपाध्यक्षा कल्पना तोमर, संस्था व मेळावा सचिव ज्योस्ना अनिल येरुणकर, संस्था व मेळावा खजिनदार नाहिदा ठाकूर, संस्था संचालिका गौरी संदीप देशपांडे, संस्था उपाध्यक्षा निशा धर्मेंद्र शिरधनकर, संस्था अध्यक्षा कल्याणी दीपक दुखंडे व सर्व सदस्या यांचे सहकार्य लाभले संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मैत्री मंडळाच्या प्रगती दळी यांची सेवा अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.

या कार्यक्रमात उरण शहरातील 16 महिला मंडळांनी सहभाग घेतला असून यामध्ये मराठा मंडळ, नाभिक समाज महिला मंडळ, मैत्री मंडळ, मिसेस किंग, युनिक ग्रुप, डॉक्टर असोसिएशन, दुर्गा माता महिला मंडळ, महालन सामाजिक संस्था, माय लेकरू ग्रुप, जे. एच. केझुब्बा क्विन्स, व्ही क्लब, फे्रण्ड्स फॉर एव्हर, ओम साई ग्रुप, टर्निंग पॉइंट, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आर. डी. ग्रुप आदी महिला मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गौरी मंत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply