


पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक काचबिंदू सप्ताहनिमित्त लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल आणि लक्ष्मी आय क्लिनिक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने अंधाराकडून उजेडाकडे या शिर्षकाखाली काचबिंदू या दृष्टीदोषाविषयी जनजागृती करण्यासाठी खारघर येथे जनजागृती रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात झाली.
खारघरमधील सेक्टर 4 येथून प्रारंभ झालेल्या रॅलीचा समारोप सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिरात झाला. या वेळी डॉ.रीटा धामनकर यांनी काचबिंदू आजारावर मार्गदर्शन केले. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक भार्गवा, सचिन भुमकर, मोहन हिंदूपूर, डॉ. हेतल शाह, मराठी फाऊंडेशन खारघरचे मंगेश रनावडे उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी प्रमोद खरात, जितेंद्र जाधव, पाचघरे, शोएब कल्याणकर आणि सर्व कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली. या रॅलीत लक्ष्मी कॉलेज ऑफ ओप्टोमेट्री व जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रॅली यशस्वीतेसाठी सर्व मीडिया, खारघर पोलीस, वाहतूक विभाग, श्री साई मंदिर विश्वस्त, विद्यार्थी आदींचे संयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.