उरण : वार्ताहर
उरण शहरातील वीजजोडणी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 13) जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. 15 कोटी रुपये खर्च करून उरण नगर परिषद हद्दीत व मोरा गावापर्यंत सर्व विद्युत वाहिन्या जमिनीखालून टाकल्या जाणार आहेत.
भूमिगत वीजजोडणीसाठी महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, या कामाचे भूमिपूजन उरण कोर्टाजवळ करण्यात आले. या समारंभास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष
जयविंद्र कोळी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, नवघर जि. प. विभागीय अध्यक्ष महेश कडू, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, वीज मंडळाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.