पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड तायक्वॉन्डो असोसिएशनतर्फे पळस्पे येथील पी. जे. बी. स्कूल येथे तायक्वॉन्डो या खेळाच्या कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत या स्कूलमधील 384 खेळाडू सहभागी झाले होते.
सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट तायक्वॉन्डोचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील आणि सहाय्यक प्रशिक्षक रूपेश माळी, तेजस माळी यांच्या निरीक्षणाखाली परीक्षा घेण्यात आली. पी. जे. बी. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विविध खेळांचेही प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होईल, असे स्कूल प्रिन्सिपल यांनी सांगितले.
भविष्यात या शाळेतील विद्यार्थी तायक्वॉन्डो खेळात आंतरराष्ट्रीय पदक मिळवतील, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला.