मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी रसायनी पाताळगंगा येथील पार्किंगमधील वाहनचालकांना अन्नदान केले.
रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र आहे. या परीसरात कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी कंटेनर, टँकर अशा मोठमोठ्या वाहनांची आवश्यकता असते. हि वाहने रसायनी पाताळगंगा परीसरात आल्यानंतर पाताळगंगा पार्कींगमध्ये थांबतात. परंतु लॉकडाऊमुळे बरीचशी वाहने पाताळगंगा पार्किंगमध्ये थांबल्याने या वाहनांवरील वाहनचालकांना पोटभर अन्न मिळणे कठीण झाले आहे. त्यांची हि अवस्था सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी लक्षात घेऊन त्यांच्या मेसर्स गायकर कंस्ट्रक्शन कंपनी व आयव्हीआरसीएल लिमिटेडकडून पाताळगंगा ट्रक पार्किंगमधील वाहनचालकांना अन्नदान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. लॉकडाऊन काळात सर्वांनी शासनाचे नियम तंतोतंत पालून सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर यांनी केले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले.