Breaking News

होम क्वारंटाईनचा नियम मोडणार्‍यांवर श्रीवर्धनमध्ये कारवाई

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त

श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात असून, परदेशातून आलेल्यांना स्वत:हून क्वारंटाईन होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. श्रीवर्धनमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे सौदी अरेबिया आणि दुबई येथून भारतात आले होते. आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सरकार सर्वांची काळजी घेत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply