Breaking News

भूखंड वाटपदारांना सिडकोची मुभा; रक्कम टप्प्याटप्प्याने ऑनलाइन भरण्यास मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत: रक्कम ऑनलाइन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय सिडकोने घेतला आहे.   

सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली उद्धृत करणार्‍या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे तपशील (इनस्टॉलमेन्ट) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात.

सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बँकांशी संबंधित समस्या, अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणार्‍या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध आदी बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाइन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी

अर्जदारांनी केली होती. -संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्यांची एकूण रक्कम टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाइन भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला. यामुळे नंतरचे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार पडणार नाही. सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्तेअंशतः ऑनलाइन पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply