Breaking News

ठाकरे सरकार युवाविरोधी

भाजपची सडकून टीका

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे, मात्र ठाकरे सरकारने 1 मेपासून कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, ठाकरे सरकार युवाविरोधी असल्याची सडकून टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
राज्यात 18 ते 44 वयोगटातील पात्र व्यक्तींना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, मात्र त्याच वेळी कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण 1 मेपासून सुरू होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. या वरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. याबाबत केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतला आहे.
आरक्षणाचा गोंधळ, परीक्षांचा बट्याबोळ तसेच आता राज्यातील युवाविरोधी ठाकरे सरकारने देशातील इतर राज्यांतील युवक 1 मेपासून लस घेत असताना धोरणाअभावी राज्यातील तरुणांना लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना मोफत लस देणार अशी माध्यमांमध्ये हवा निर्माण करणारे महाविकास आघाडी सरकार दिशाहिनतेने पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे, असा घणाघात उपाध्ये यांनी केला.
येथे निव्वळ घोषणाबाजी
18 वर्षांपुढील सर्वांना लस मिळावी व राज्य सरकारला लस खरेदीची परवानगी मिळावी या दोन्ही मागण्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही मागण्यांना परवानगी दिल्यावर मात्र राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे. आसाम, गोव्यासारखी राज्ये लसीची मागणी नोंदवत असताना येथे मात्र निव्वळ घोषणाबाजी सुरू होती, असा आरोपही उपाध्ये यांनी केला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply