Breaking News

रस्त्यातील झाडाचे ओंडके उचलले; भाजपचे विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागाच्या विकासासाठी सतर्कता दाखवत तातडीने येथील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करून दिले आहे. त्यांच्या प्रभाग क्र. 18 मधील रस्त्यावर अतिवृष्टीमुळे पडलेल्या झाडांचे कटाई केलेले ओंडके उचलण्याचेे काम त्यांनी करून घेतले आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील वाहतूकीस होणारा अडथळा दूर झाला असल्याने नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले. अतिवृष्टीमुळे प्रभाग 18 येथील आशियाना चेंबर्स सोसायटी-अमरधाम रोड वर असलेल्या झाड पडले होते. तात्पुरती कटाई करून प्रशासनाने ते झाडाचे ओंडके रस्त्यालगत लावून ठेवले होते. आज उद्या करत झाडाचे ओंडके उचलण्यास टाळाटाळ चालली होती. शेवटी वृक्षप्राधिकरण अधिकार्‍यांना सांगून काम पूर्ण करून घेण्यात आले. माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राथमिकता देत असतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply