Breaking News

कोरोनाविरुद्धची लढाई सर्व मिळून यशस्वी करू या!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
संकटाच्या काळात एकमेकाला मदतीचा हात देऊन कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी करू या, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सर्वांनी घरातच राहून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच सुरक्षितपणे राहावे. अत्यावश्यक बाब आठवड्यातून एखाद-दुसर्‍या वेळेला असू शकते. रोजच घराबाहेर पडण्याला अत्यावश्यक नाव दिले तर आपण सावरू शकत नाही. उलट लॉकडाऊनचा कालावधी वाढवत घेऊ तसेच ज्यांना आर्थिकदृष्ट्या या संकटात उभे राहता येत नाही त्यांच्यासाठी धोका निर्माण करू. पनवेल महापालिका आपल्या दारापर्यंत सेवा आणण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा लाभ घ्या. तालुक्यातील ग्रामीण भागात आम्ही भाजपच्या वतीने गोरगरीब, गरजूंना मदत करीत आहोत. जे कमी आहे ते शासनाकडे मागत आहोत, पण सर्वांना विनंती आहे की संकटाच्या काळात एकमेकाला मदत करा, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण सारी मंडळी चिंतेत आहोत. पनवेल महापालिकेतील कोरोनाचे लोण थोडे थोडे करीत शहरांतून गावांमध्ये पसरायला लागले आहे. तालुक्यात नेरे, काळुंद्रे येथे प्रत्येकी एक पेशंट, शेजारील उरणमध्ये दोन, तर श्रीवर्धन व अन्य ठिकाणी रूग्ण आढळले आहेत. पनवेल परिसरात वेगवेगळ्या कारणांनी कोरोना झालेले रूग्ण आढळत आहे. दुर्दैवाने एक रूग्णाला आपला जीवही गमवावा लागला, पण बर्‍याच वेळा असे घडते की दुसरा कुठला तरी आजार आहे आणि मग अशा वेळेला कोरोना झाल्यास धोका उत्पन्न होण्याची शक्यता वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे, याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष वेधले.
एकीकडे सर्वांना चिंता आहे ती म्हणजे लॉकडाऊन किती काळ चालू राहणार? अशा स्थितीत जे वेगवेगळे झोन्स बनविले गेले आहेत त्यापैकी रेड झोनव्यतिरिक्त अन्य ठिकाणी काही अटींसह उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरचा ताण काही अंश कमी होऊ शकेल, पण ज्यांना ती परवानगी मिळाली त्यांनी आपल्याकडे हा रोग पसरू नये या दृष्टीने काम केले पाहिजे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
एक असे वृत्त आहे की पाकिस्तान कोरोनाचे रुग्ण आपल्याकडे पाठविण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून हा रोग आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पसरावा. पाकिस्तान जे करू इच्छित आहे ते किमान आपण स्वत: करू नये. आपल्यामुळे कुणाला हा रोग होणार नाही आणि इतरांपासून आपल्याला व परिवाराला लागण होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply