Breaking News

मनोरुग्ण महिलेस केले कुटुंबाच्या स्वाधीन; पोलीस व सहज सेवा फाऊंडेशनचा पुढाकार

खोपोली ः प्रतिनिधी

लॉकडाऊन व संचारबंदीकाळात शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना प्रचंड व्यस्त व तणावाखाली आहेत. शहरात अनोळखी व्यक्ती दाखल झाल्यास सर्वांची त्रेधातिरपीट उडते. 20 एप्रिल रोजी रात्री एक अनोळखी महिला शिळफाटा येथे रोडने प्रवास करताना दिसली. अधिक चौकशी केली असता ही महिला मनोरुग्ण असल्याचे निदर्शनास आले. ही महिला फलटण येथील असून तिचे नाव तेजू श्याम मोहिते असल्याचा शोध काढण्यात पोलीस यशस्वी झाले. यानंतर महिलेच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे घरचे या महिलेस खोपोलीपर्यंत येऊन घेऊन जाण्यास असमर्थ होते.

खालापूर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक निरीक्षक सतीश आसवर, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पाटील व सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. शेखर जांभळे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. याकामी राजू गायकवाड व अविनाश किरवे यांनी विशेष सहकार्य केले. खोपोली पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल सविता कांगने व सहज सेवा फाऊंडेशनचे अल्ताफ सय्यद यांनी या महिलेस  21 एप्रिल रोजी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून फलटण येथे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply