Breaking News

‘अत्यावश्यक सेवा बजावणार्या कर्मचार्यांची कोरोना चाचणी करा’

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी व कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संकटात आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे राहुल शिंदे यांनी केली आहे. आपली 16 लाख लोकसंख्या असताना सुद्धा आपल्या महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीच्या व खबरदरीच्या जोरावर कोरोनासारख्या महामारीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यास यशस्वी ठरलो आहोत. कर्मचारी आपले हॉस्पिटल, सेंट्रल किचन, सर्वे, जेवणाचे वितरण, निवारा केंद्रात, क्वारंटाईन सेंटर, हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार असे काम करीत आहे. त्यांचा कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच पालिकेने सतर्क होण्याची गरज आहे. नागरिकांची सुरक्षा घेताना पालिकेने या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालिकेने या कर्मचारी व कंत्राटी कामगारांची कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे असून त्यामुळे व कामगार वर्ग व त्यांचे कुटुंबाची चिंता मुक्त होईल, अशी मागणी भाजपचे राहुल शिंदे यांनी केली आहे.

चिर्ले येथील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन करून संपूर्ण देशाला सरकारने कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये मोलमजुरी करणार्‍या निराधारांची उपासमार होऊ नये, यासाठी प्राणी मित्र आनंद मढवी मित्र मंडळ, आणि लालबागचा राजा ग्रुप चिर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने चिर्ले परिसरातील गरजूंना आणि निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दोनवेळच्या अन्नाची खळगी भरण्याचे काम केले आहे. त्यामुळे या निराधार महिलांच्या चेहर्‍यावर उमटणारे स्मितहास्य पाहून मदतनिसांनाही आपण केलेल्या कार्याची पावती मिळाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उपक्रमात वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, ग्रामपंचायत सदस्य आकाश घरत, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मढवी, संतोष मढवी, अभय मढवी, दिलीप मढवी, मधुकर मढवी, धर्मेंद्र मढवी, कैलास मढवी, बंटी शेळके, पंकज घरत, पंकज मढवी, मयूर मढवी, विनीत मढवी, सिद्धार्थ मढवी, जितेंद्र बुवा, दर्शन मढवी, समाधान मढवी आदींनी एकत्र येऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply