Breaking News

परीक्षेसाठी राजस्थानला गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

नीट 2020 परीक्षेसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रातील जवळपास एक हजार विद्यार्थी नीट 2020 परीक्षेची तयारी करण्यासाठी राजस्थानच्या कोटा येथे शिकण्यास गेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होण्यासाठी केंद्र सरकारने आधी 14 एप्रिल आणि नंतर 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आपल्या घरी परतण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत तसेच विद्यार्थ्यांची तेथे राहण्या-खाण्याची गैरसोय होत आहे, अशा तक्रारी त्यांच्या पालकांनी केल्या आहेत. अनेक राज्यांनी त्या राज्यातील विद्यार्थी-पालकांच्या विनंतीवरून विशेष बसेसच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे पालन करून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील राजस्थान कोटा येथे अडकलेले विद्यार्थी लवकरात लवकर आपल्या घरी सुखरूप पोहचावेत यासाठी आपल्या स्तरावर तातडीने नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply