Breaking News

वाहतूकदार, वाहनचालक हवालदिल; आरटीओच्या कामांना तीन महिन्यांची मुदत द्या -राजेंद्र शर्मा

कळंबोली : प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीत देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीच्या कालात सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. शासकीय कामकाज बंद असल्याने सर्वच उद्योगधंद्याचे मोठं नुकसान झाले आहेत. शासनाचा आरटीओ हा मोठे महसुल विभाग ठप्प आहे. त्यामुळे हप्ते भरणार कसे याने यामुळे वाहन चालक आणि वाहतूकदार हवालदिल झाला आहे . तेव्हा परिवहन विभागाने त्यांना पुढील तीन महिने मुदत द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केंद्रीय परिवहन मंत्री यांच्याकडे केली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संपुर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर संपर्ण व्यवसाय बंद आहे. त्यामुळे लाखो ट्रक, ट्रेलर, डंपर उभे आहेत. वाहन चालक बसून आहेत. याचा सर्वाधिक फटका वाहन चालक व वाहतूकदाराना बसला आहे. या बंदीमध्ये परमिट नुतनिकरण, पासिंग, टीपा, लायसंसची मुदत संपून गेली आहे. त्यात दीड महिन्यापासून उभ्या असलेल्या गाड्यांचे हप्ते कसे भरायचे अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तेव्हा आरटीओचे कामकाज सुरू होईल त्यावेळी वरील कामासाठी कोणताही दंड न आकारता त्यांना तीन महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शानाखाली पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या आणीबाणीत देश सापडला असून लॉकडाऊन नंतर व्यवसायाना उभारी देण्यासाठी शासनाने प्रत्येक व्यवसायात शिथिलता देणे अत्यंत गरजेचे आहे. त्याप्रमाणे आरटीओकडून वाहतूक कर, परमिट नुतनिकरण, पासिंग, टीपा, लायसंस असा अन्य कामासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात यावी, अशी मागणी वाहतुकदारांकडून केली जात आहे. आपण याचा पाठपुरावा केंद्रीय परिवहन मंत्र्यांकडे करणार आहोत – राजेंद्र शर्मा, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply