Breaking News

वनौषधी रोपांच्या भेटी

वाढदिवसाची नवीन संकल्पना

पनवेल : वार्ताहर

काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देवून पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, बाळकृष्ण कासार, विक्रम येवले, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, संजय पवार आदी उपस्थित होते.

आर्या प्रहरचे संपादक सुधीर नामदेव पाटील यांच्या हस्ते पत्रकार हरेश साठे यांना काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देण्यात आले. या वेळी सुधीर पाटील यांनी काडेचिराईत या वनौषधी बद्दल माहिती देताना सांगितले की, काडे चिराईत ही वनस्पती लिव्हर विकार, उदर विकार, अपचन, ताप, कफ, पित्त, कृमी, श्वास, प्रदर, आमवात यावर खूपच उपयुक्त आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधी रोपे भेट देण्याची नवी संकल्पना पनवेलमध्ये आर्या प्रहरचे संपादक व आर्या वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रत्यक्षात आणली आहे. उत्स्फूर्तपणे वनौषधी रोपे भेट देणे, रोपे लावणे, लावलेल्या रोपांचे जतन करण्याची सवय सुधीर पाटील यांनी स्वतःला लावून घेतली आहे, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण कासार यांनी या वेळी व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply