Breaking News

अलिबागच्या लायन्स हेल्थ फाउंडेशनचा नेत्ररोगाविरुद्ध लढा; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सोगावमध्ये भूमिपूजन

अलिबाग : प्रतिनिधी

लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील 65 हजार लोकांची नेत्रतपासणी, सहा हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील 4500 मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाउंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे प्रशंसोद्गार लायन्स इंटरनॅशनलचे डायरेक्टर व्ही. पी. नंदकुमार यांनी काढले. अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे लायन्स हेल्थ फाउंडेशन अद्ययावत नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व नेत्रचिकित्सा प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. या इमारतीचे भूमिपूजन रविवारी (दि. 14) सकाळी लायन्स इंटरनॅशनलचे डायरेक्टर व मणीप्पुरम गोल्ड कंपनीचे मालक व्ही. पी. नंदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होत. या सुपर स्पेशालिटी नेत्ररुग्णालयाच्या माध्यमातून नेत्रपेढी, डायबेटीसवर उपचार, डायलेसिसची सोय, तसेच इतरही वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आवाहन नंदकुमार यांनी या वेळी केले. एरिया लीडर हनुमान अगरवाल, मल्टिपल कौन्सिल चेअरमन राकेश चौमल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लुनकरन तावरी, अलिबाग अध्यक्ष अनिल जाधव, सचिव प्रवीण सरनाईक यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रांतपाल मुकेश तनेजा, अमरचंद शर्मा, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, रिजन चेअरमन अरविंद घरत, माजी प्रांतपाल बाबुराव पिसाळ, अशोक जोशी, राजेश प्रजापती, ओमप्रकाश अरोरा, के. जे. पॉल, डॉ. जयंत पारेख, संतोष चौहान, आरडीसीसी बँकेचे सीईओ प्रदीप नाईक, नयन कवळे, प्रदीप सिनकर, प्रवीण घरत यांच्यासह लायन्स क्लब अलिबाग, मांडवा, पोयनाड, डायमंड, पनवेल, पेण, नागोठणेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती प्रधान यांनी केले. डिस्ट्रीक ट्रेझरर अनिल म्हात्रे यांनी आभार मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply