Breaking News

‘त्या’ कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी व्यवस्था करावी; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवा द्यावयास जातात अशा शासकीय व खाजगी आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी यांची कामाच्या ठिकाणाजवळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका क्षेत्र व त्या सभोवतालच्या ग्रामीण भाग यामधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50च्या उंबरठ्यावर पोहचलेली असून, कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्याकरिता राज्यशासन व राज्यशासनाच्या विविध शाखा शर्थीचे प्रयत्न करीत असून, या करिता राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन चा अवलंब केलेला असून, सर्व सामान्य नागरिकही या लॉकडाऊन नियमांचे पालन करताना दिसून येत आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की, जे नागरिक पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यस असलेले, परंतु, नोकरी व कामाच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई व तत्सम क्षेत्रातील अनेक कर्मचारी सध्या अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, सीआयएसएफ जवान याचं प्रामुख्याने समावेश असून यापैकीच काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांच्या संपर्कात येऊन त्यांचे नातेवाईक व इतर नागरिकही बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर यशस्वीपणे पायबंध घालण्याकरिता उक्त उल्लेखित अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची त्यांचा कामाच्या ठिकाणाजवळ हॉटेल, हॉस्टेल आशा ठिकाणी व्यवस्था करण्याची आदेश देण्यात यावेत जेणेकरून यामुळे सदरील कोरोना संक्रमण थांबून प्रशासनासमोरील मोठे आवाहन टळून, कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या कमी होण्यास मदत होईल संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत, अन्यथा संबंधितावर दांडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply