Breaking News

गाढी नदीच्या कडेला मृतदेह आढळला

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळील गाढी नदीच्या कडेला टी-पॉईंट ते कळंबोली सर्कल हायवे रोडवर चालू असलेल्या ब्रिजच्या कामाठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

मृत इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 असून, केस सर्वसाधारण, एक डोळा अर्धवट रानटी जनावराने खाल्लेला आहे. त्याच्या अंगात सफेद रंगाचा त्यावर काळ्या रंगाचा ठिपके असलेला फुल बाह्याचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. या इसमाबाबत कुणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (022-27452333) किंवा उपनिरीक्षक संतोष उगलमुगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply