Breaking News

श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 27) करण्यात आले होते. या अभियानाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेलमधील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलावर तसेच सर्व शासकीय कार्यालयांसमोर श्रीसदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या अभियानात साडेचार हजारांहून अधिक श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला तसेच सुमारे 110 टन कचरा या वेळी गोळा करण्यात आला.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply