Breaking News

पनवेल मनपा प्रभाग 20मध्येही मोदी भोजन कम्युनिटी किचन

गरीब, गरजूंना अन्नछत्राचा लाभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल शहर यांच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन ही संकल्पना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रभाग 20मध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.
प्रभाग 20मध्ये तक्का परिसरातील वैदूवाडी व दर्गा तसेच पोदी या ठिकाणी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हे अन्नछत्र सुरू असणार आहे. या अन्नछत्राचा मोलमजुरी, बेघर, हातावर पोट असलेल्या गरजूंना खूप मोठा फायदा होत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply