Breaking News

राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार पैलवान रुपेश पावशे यांना जाहीर

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने यंदाचा ’राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

पैलवान रुपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. 2002 पासून कुस्तीला सुरुवात करून अनेक स्पर्धा मैदाने गाजवून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव राज्यस्तरावर त्यांनी गाजविले आहे. त्यांनी कुस्तीमध्ये अनेक पारितोषिके, मानसन्मान मिळविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने 12 नोव्हेंबरला होणार आहे. तसेच प्रत्यक्ष पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबई, पुणे व नाशिक या ठिकाणी शासनाच्या नियमांनुसार व वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply