Sunday , June 4 2023
Breaking News

गुढीपाडव्यानिमित्त कुस्तीचे सामने

मुरूड : प्रतिनिधी

पंचक्रोशी आगरी समाज नांदगाव-मजगाव विभागीय तप्पा सामाजिक संस्था उसरोली मुरूड यांच्यातर्फे गुढीपाडव्यानिमित्त कुस्तीचे भव्य जंगी सामने शनिवारी (दि. 6) श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगरच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहेत. या कुस्ती सामन्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील दामोदर राऊत हे असणार आहेत, तर या कुस्ती सामन्याचे उद्घाटन शनिवारी दुपारी 3 वाजता मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात येणार आहे.

बक्षीस वितरण समारंभासाठी अ‍ॅड महेश मोहिते, अ‍ॅड. मोहन तांबडकर, तर विशेष अतिथी म्हणून महेंद्रशेठ दळवी उपस्थित राहणार आहेत. खूप वर्षानंतर या ठिकाणी कुस्तीचे सामने होणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply