माणगाव : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांचे मंगळवारी (दि. 28) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नाविद अंतुले यांचे मूळ गाव म्हसळा तालुक्यातील आंबेत असले तरी ते व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. दोन वर्षांपूर्वी आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रिय झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. नाविद यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …