Breaking News

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदान ः नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 60वा वर्धापनदिन अर्थात हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन शुक्रवारी (दि. 1) साधेपणानेच साजरा करण्यात आला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आता 60 वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विटरवरून महाराष्ट्रातील जनतेला मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील बंधू-भगिनींना माझ्या शुभेच्छा. येणार्‍या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नागरिकांनाही गुजरात स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गुजराती लोकांनी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply