Breaking News

व्यायाम आणि आहार

आरोग्य प्रहर

फिटनेसविषयीची जागृती एका वर्गापुरती मर्यादित होती, मात्र आता शारीरिक स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच व्यायामाकडे कल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये फिट राहण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकेच आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. उपाशीपोटी व्यायाम केला पाहिजे, व्यायाम करताना पाणी पिऊ नये, व्यायामानंतर भरपूर खावे अशा अनेक गैरसमजुती लोकांमध्ये असतात.

* शहरातील व्यग्र जीवनामध्ये व्यायाम केव्हा करावा हे सोयीने ठरवावे, मात्र व्यायामाआधी आणि नंतर काय खावे याचे गणित कोणत्याही वेळेस व्यायाम केला तरी सारखेच आहे.

* व्यायाम करण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हलका आहार घ्यावा, ज्यामध्ये कोणतेही एखादे फळ खाल्ल्यास उत्तम. फळामध्ये असलेली कार्बोहायड्रेट आणि पाणी व्यायाम करताना शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतात. दोन ते तीन खजूर आणि लिंबूपाणी प्यायले तरी चालेल.

* व्यायामादरम्यान पाणी पिऊ नये हे साफ चुकीचे आहे. व्यायाम करताना येणार्‍या घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. अशा वेळी पाण्याची शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे व्यायाम करताना पाणी प्यावे. पाण्याऐवजी काळे मीठ घातलेले लिंबूपाणी प्यायले तरी चालेल.

* व्यायामानंतर बर्‍याचदा लोक घरी गेल्यावर जेवणाच्या ताटावर बसतात. व्यायाम करून घरी आल्यानंतर आंघोळ करावी. त्यामुळे शरीराला थोडा आराम पडतो. त्यानंतर साधारणपणे प्रथिनयुक्त पदार्थ थोड्या प्रमाणात खावेत. यामध्ये चणे, शेंगदाणे (फक्त मूठभर) खावेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रथिने शरीराला मिळतात. अंजीरसारखे सुके फळ खाल्ले तरी चालेल, परंतु हा आहार थोडकाच असावा. यानंतर साधारण अर्ध्या तासाने जेवण किंवा न्याहरी करावी.

* जिममध्ये जाणार्‍यांना बहुतांश वेळा प्रथिने असलेले शेक किंवा पावडर खाण्यास दिल्या जातात. अशा प्रकारच्या पावडर या जंकफूडप्रमाणे असून यापेक्षा ताजी फळे आणि भाज्या खाणे केव्हाही चांगले.

* व्यायामाच्या आधी किंवा नंतरच्या आहारामध्ये लिंबूपाणी किंवा कोकम सरबत अशी पेये घेत असाल तर त्यामध्ये साखर शक्यतो कमीच वापरा.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply