प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी
कोरोना रोगाच्या पार्श्ववभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय, परजिल्ह्यतील नागरिक, मजूर, रहिवासी, पर्यटक हे ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्या येण्या जाण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी गुगलवर एक फॉर्म डेव्हलप करण्यात आला आहे. फॉर्म दिलेल्या लींकवर ऑनलाइन पद्धतीनेही भरता येणार आहे. यामाध्यमातून प्रशासन ज्यांना जायचे किंवा यायचे आहे त्याचा विचार करून अर्ज केलेल्या मोबाइल नंबरवर कळविणार आहे. यासाठी फॉर्म मिळविण्याकरिता नागरिकांनी तहसिल कार्यालयात गर्दी करून नये, असे आवाहन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली आहे. राज्यशासनाच्या सूचनेनुसारव मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बाहेरगावी जाणार्या, किंवा परराज्यात जाणार्या नागरिकांसाठी अर्ज भरण्याचे काम सुरु झाले असून रायगड जिल्ह्यातील ज्या नागरिकांना परराज्यात गावी जायचे असलेल्यांनी https://forms.gle/fgEG NoGTxber4H Rs5, तसेच भारतातून किंवा परराज्यातून रायगड जिल्ह्यात येणार्यांनी https://docs.google.com/ forms/d/e/1F-IpQLSf OouvUIšw6sXNv mi7pxSoryj3 e3d2b7zOkIwmL 8kY9Swnnnw/vie wform?usp=s fšlink या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावयाचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जावर काय कार्यवाही झाली याची माहिती व्यक्तीने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर दिला जाणार आहे. यामुळे गर्दी टाळता येणार आहे. अर्जाची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
तसेच तहसीलदार पुढे म्हणाले, अर्ज मिळवण्यासाठी नागरिकांनी तहसील कार्याला येथे गर्दी केली होती. यासाठी तलाठी वर्गाला संबंधित विभागानुसार अर्ज नोंदणी करण्यास सांगितले असून, ज्या मजुरांना, व्यक्तींना जायचे असेल त्याचे फॉर्म कंत्रादारकडे जमा करण्यास सांगितले आहेत तसेच अधिक माहितीसाठीपेण शहरातफलकही लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी 02143-252036 या क्रमांकांवर फोन लावून माहिती घेऊ शकतात. दिलेल्या लिंकवरूनही आपले फ़ॉर्म भरू शकतात असे तहसिलदार अरुण जाधव यांनी सांगितले आहे.