पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष आणि रिद्धी रिंकल सामाजिक विकास मंडळ सुकापूर यांच्या वतीने कला, संस्कृती महोत्सव 2019चे आयोजन बुधवारी (दि. 13) करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या महोत्सवात हळदीकुंकू, खेळ रंगला पैठणीचा, नृत्यमल्हार असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. या स्पर्धात्मक महोत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते चाहूशेठ पोपेटा, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, आलूराम केणी, अशोक पाटील, मंगलबुवा पाटील, आत्माराम पाटील, बाळकृष्ण पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, वर्षा नाईक, भाजप महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस लीना पाटील, श्वेता खैरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत यांनी मनोगत व्यक्त केले.