Breaking News

धार्मिक सभा उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी

नेरूळ येथील श्री शनिश्वर सेवा समितीच्या वतीने शनिमंदिरात महापूजा, भव्य रथोत्सव आणि धार्मिक सभेचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सर्व धार्मिक श्रद्धाळू शनिमंदिरात नतमस्तक होत असल्याने येथे एकात्मतेचे दर्शन घडते, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी बोलताना केले. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे, धार्मिक प्रवचनकार भाग्यश्री सातारकर, मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार चरणसिंग सप्रा, उद्यान व शहर सुशोभीकरण सभापती मीरा पाटील, पनवेल मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह शनिमंदिराचे विश्वस्त, मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply