Breaking News

माणगाव आश्रमशाळेने बनविले मास्क

माणगाव : प्रतिनिधी
 कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रकारच्या मास्कची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. बाजारात 20 ते 30 रुपयांपासून मास्क मिळतात. ग्रामीण व आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना हे मास्क मिळत नाहीत किंवा विकत घेताना अडचणी येतात. ही समस्या ओळखून माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील कर्मचारी व सामाजिक कार्यात आवड असणार्‍या महिलांनी 90 मीटर उत्तम प्रतीच्या कापडापासून 1750 इतके मास्क तयार केले व ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना त्याचे वाटप केले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनासह सामाजिक संस्थांनी कंबर कसली असून, विविध प्रकारे नागरिकांना मदत केली जात आहे. यामध्ये माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेनेही योगदान दिले. आश्रमशाळेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 40 वाड्यांवर 1750 मास्कचे वितरण करण्यात आले. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले. आश्रमाने पुरविलेल्या या साहित्यामुळे आदिवासींनी आभार व्यक्त केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply